X
X

Fact Check : शत्रुघ्न सिन्हा ने नाही केले व्हायरल ट्विट, पोस्ट खोटी आहे

शत्रुघ्न सिन्हा च्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी असल्याचे कळले.

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर शत्रुघ्न सिन्हा चा एक ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विट द्वारे दावा करण्यात येत आहे कि शत्रुघ्न सिन्हा हे सरकारच्या विरोधात बोलले आहेत. विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास केला, त्यात आम्हाला कळले कि शत्रुघ्न सिन्हा च्या नावावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे.

काय होत आहे व्हायरल?
फेसबुक यूजर रोहित ने ‘जाटों की महफिल’ नावाच्या एका ग्रुप वर शत्रुघ्न सिन्हा ची एक खोटी ट्विट पोस्ट केली आणि लिहले: “चलो ईबे किसे का तो ज़मीर जीवे ह ।। देर त सही पर कही कति सही.”

दावा केला जात आहे कि शत्रुघ्न सिन्हा ने ट्विट करून लिहले: ‘पहले ईवीएम से वोटों की लूट, फिर नोटबंदी से नोटों की लूट, सरहद पर जवान हो रहे शूट, बड़े उद्योगपतियों को टैक्‍स छूट, गरीब की आमदनी में हुई लूट, बदन पर दस लाख का सूट, पैरों में पहने तीन लाख का बूट और मुह में केवल झूट ही झूट।’

व्हायरल पोस्ट मध्ये लिहलेल्या गोष्टी जशाच्या ताशा इथे दिलेल्या आहेत. या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे क्लिक करून बघा.

तपास:
विश्वास न्यूज ने सगळ्यात आधी @sirshatrudhanji नावाच्या एका ट्विटर हॅन्डल वर तपास केला, कारण व्हायरल ट्विट मध्ये याच्याबद्दल सांगितले गेले. तपासाच्यावेळी आम्हाला असा कुठलाच ट्विटर हॅन्डल सापडला नाही. याचा अर्थ स्पष्ट होता कि व्हायरल ट्विट खोटा आहे.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही शत्रुघ्न सिन्हा यांचा खरा ट्विटर हॅन्डल शोधला. हा @ShatruganSinha या नावाने आहे. याला स्कॅन केल्यावर आम्हाला कळले कि २१ फेब्रुवारी रोजी शत्रुघ्न सिंह यांनी एक व्‍यंग्‍यात्मक ट्वीट पेट्रोल वरून केले. खाली हा ट्विट तुम्ही बघू शकता.

आतापर्यंत विश्वास न्यूज च्या तपासात हे स्पष्ट झाले होते कि शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावावर व्हायरल ट्विट खोटा आहे. विश्वास न्यूज ने या संबंधात आपले सहयोगी दैनिक जागरण च्या बॉलीवूड कव्हर करणारे मुख्य संवाददाता स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. आम्ही त्यांच्या सोबत व्हायरल पोस्ट शेअर केली. त्यांनी पुष्टी करून सांगितले कि हा ट्विट खोटा आहे, आणि शत्रुघ्न सिन्हा चा हा खरा अकाउंट नाही आहे.

आम्ही खोटी पोस्ट करणाऱ्या यूजर चा अकाउंट तपासाला. त्यात आम्हाला कळले कि फेसबुक यूजर Rohit Bangar हे हरियाणा चे झज्जर चे रहिवासी असल्याचे कळले. या पेक्षा जास्ती माहिती आम्हाला अकाउंट वर मिळाली नाही.

निष्कर्ष: शत्रुघ्न सिन्हा च्या नावावर व्हायरल होत असलेली ट्विट खोटी असल्याचे कळले.

  • Claim Review : शत्रुघ्न सिन्हा ने सरकार विरोधी ट्विट केले
  • Claimed By : Rohit Bangar
  • Fact Check : False

Know the truth! If you have any doubts about any information or a rumor, do let us know!

Knowing the truth is your right. If you feel any information is doubtful and it can impact the society or nation, send it to us by any of the sources mentioned below.

टॅग्स

Post your suggestion

No more pages to load

संबंधित लेख

Next pageNext pageNext page

Post saved! You can read it later